पालघर नगर परिषदेत दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१.८३ टक्के मतदान --पुरुष ३१.४९%, महिला ३२.२०%; -- अल्याळी येथील बेंदरपाडा केंद्र आघाडीवर




नदीम शेख,पालघर


दि. २ डिसेंबर

नगरपरिषद निवडणुकीत आज सकाळपासून मतदानाची शांततेत सुरुवात झाली असून दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१.८३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या साडेपाच तासांच्या कालावधीत ५५,७२७ पैकी १७,७३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.


मतदार तपशिलानुसार, पुरुष मतदारांपैकी ९,२२१ जणांनी मतदान करत ३१.४९ टक्के तर महिलांपैकी ८,५१४ जणांनी मतदान करत ३२.२० टक्के मतदानाची नोंद केली आहे. मतदानाची वाढती गती पाहता सकाळी ९.३० पर्यंत मतदान ८.८५ टक्के होते. त्यानंतर ११.३० वाजेपर्यंत ही टक्केवारी १९.३१ झाली आणि दुपारी १.३० पर्यंत ती वाढून ३१.८३ टक्क्यांवर पोहोचली.


दरम्यान, सर्वाधिक मतदान बेंदरपाडा समाजमंदिर, अल्याळी, खोली क्रमांक ०१ (८/५) येथे नोंदवले गेले असून दुपारपर्यंत या केंद्रावर तब्बल ४२.७२ टक्के मतदान झाले आहे. नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा वेग दुपारनंतर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post