तारापूर औद्योगिक संघटनेकडून ग्रामीण रुग्णालयाची जागा रिकामी करण्याच्या हालचालींना विरोध.

 टीमा हॉस्पिटलच्या स्थलांतरामुळे ग्रामीण आणि औद्योगिक कामगारांना आरोग्यसेवांपासून वंचित राहण्याची भीती.


बोईसर.तारापूर औद्योगिक उत्पादन संघटनेने बोईसर, पालघर रोडवरील खैरा पाडा, सरावली येथील फ्लायओव्हरजवळ असलेल्या टीमा हॉस्पिटल या ग्रामीण रुग्णालयासाठी दिलेली जागा रिकामी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे सरकारी रुग्णालय बोईसर व सरावली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, स्थानिक नागरिक आणि MIDC परिसरातील औद्योगिक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना परवडणाऱ्या आरोग्यसेवा पुरवते. सामान्य वैद्यकीय तपासणी, लसीकरण, प्रसूती सेवा, किरकोळ शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा यांसारख्या सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत. याशिवाय, तारापूर औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) लाभांचा याच रुग्णालयात उपयोग करतात.

रुग्णालयाचे स्थलांतर झाल्यास, ग्रामीण भागातील आणि औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवांपासून वंचित राहावे लागेल किंवा त्यांना उपचारांसाठी लांबचा प्रवास करावा लागेल. यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन लोखंडे यांनी याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, ग्रामीण भागातील आणि औद्योगिक कामगारांसाठी जवळच्या पर्यायी रुग्णालयाची सोय होईपर्यंत जागा रिकामी करण्याच्या हालचाली थांबवाव्यात. स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या हितासाठी ही मागणी तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, ह्या बाबतीत निवेदन ही देण्यात आले. असे त्यांनी स्पष्ट केले. 
टीमा हॉस्पिटल हे ग्रामीण आणि औद्योगिक कामगारांसाठी जीवनदायी आहे. जोपर्यंत जवळच्या पर्यायी रुग्णालयाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत जागा रिकामी करण्याच्या हालचाली थांबवाव्यात. आम्ही याविरोधात आंदोलन करू आणि नागरिकांचे हक्क वाचवू."
सचिन लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया:

Post a Comment

Previous Post Next Post